मुंबई

मुंबईच्या जीटी रुग्णालयात ब्रिटन, पश्चिम आशियातून आलेल्या रुग्णांवर होणार उपचार

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईच्या जी.टी. रुग्णालयात ब्रिटन आणि पश्चिम आशियामधून मुंबईत परतलेल्या रूग्णांना दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. परदेशात कोरोनाव्हायरसच्या नव्याने आढळलेल्या स्ट्रेनमुळे भारतातही चिंतेचे  वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सरकारी रुग्णालय गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयाचे अंशतः कोविड -19 सुविधेमध्ये रूपांतर केले गेले आहे. जे लोक ब्रिटन आणि पश्चिम आशियातून परत आले आहेत आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना इथे प्रवेश देण्यात येईल. संक्रमित देशांतील सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना जीटी रुग्णालयात पाठवले जाईल.

“ या रूग्णांना दाखल करण्यासाठी आम्ही फक्त जीटी रुग्णालयाची तरतूद केली आहे. जेणेकरून नव्या व्हायरल स्ट्रेनमुळे त्यांना संसर्ग झाल्यास ते इतर कोविड -19 रूग्णांना संक्रमित करु शकणार नाहीत आणि संक्रमण पुढे पसरणार नाही. त्यांना इतरांपासून वेगळे करणे महत्वाचे आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
जीटी रुग्णालयाच्या एका इमारतीत चाळीस खाटांचा उपयोग कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी तर उर्वरित नॉन कोविड रूग्णांसाठी केला जाईल. राज्य अधिका-यांनी सांगितले की व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या रुग्णांना एकत्र ठेवले तर संसर्ग होण्याचा धोका अधिक असू शकतो.
“ आम्हाला सर्व कोविड -19 पॉझिटिव्ह केसेस यूके किंवा मध्यपूर्वेकडून जीटी रुग्णालयात पाठवण्यास सांगितले आहे. इतर सर्व कोविड -19 च्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात, असे सेंट जॉर्ज  रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. सेंट जॉर्ज रुग्णालयात 220 बेड्स असून सध्या फक्त 35 रुग्ण दाखल आहेत. 

कोविड -19 चा आलेख आता खाली सरकत असल्यामुळे शहरातील इतर कोविड सेंटरमध्येही फारच कमी बेड भरलेले आहेत. बीकेसी जंबो सेंटरमध्ये 1,026 पैकी 279 बेड्स भरलेले आहेत. दहिसर जंबो सेंटरमध्ये 442 बेड्स पैकी 84 बेडस् भरलेले आहेत. मुलुंडमध्ये 135 बेड्स भरले आहेत. आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात 1,495 पैकी 691 बेड्स भरले आहेत.  नेस्को गोरेगावमध्ये 2,040 खाटांपैकी केवळ 136 बेड्स भरलेले आहेत.
रुग्णालयाचे कोविड केंद्रात परत रूपांतर करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीचे काम भारताने सुरू केले.

Patients from Britain and West Asia will be treated at Mumbais GT Hospital

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT