मुंबई

विलगीकरण केंद्रातील देशभक्तीचा जोश; रुग्णांचे असे वाढले मनाेधैर्य

संजय घारपुरे

मुंबई ः कोरोना महामारीमुळे सर्व धर्मियांच्या सण, उत्सवात उत्साह दिसला नाही. पण कोरोनावरील उपचारासाठी असलेल्या विलगीकरण केंद्र अपवाद ठरले. अंधेरी पश्‍चिम येथील लक्ष्मी बिझनेस पार्कमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तिरंगी पोषाक परिधान केलेल्या रुग्णांनी केंद्राच्या आवारात ध्वजवंदन केले. या कार्यक्रमातील सहभाग हा रुग्णांसाठी सुखद धक्का होता. 

या विलगीकरण केंद्रातील डॉक्‍टर तसेच नियुक्ती कर्मचाऱ्यांनी येथील 70 रुग्णांसह स्वातंत्र्यदिन साजरा केला असल्याचे वृत्त आहे. रुग्णांनी केंद्राच्या बाल्कनीत येऊन राष्ट्रगीत म्हटले. तसेच ते केंद्राच्या आवारात झालेल्या ध्वजवंदन सोहळ्यात सहभागी झाले. 

आनंदवार्ता : पालघरची पाण्याची चिंता मिटली

रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉ शाम कमल, डॉ. मनिषा जाधव आणि डॉ कुसुम गुप्ता यांनी ही संकल्पना केवळ मांडलीच नाही तर प्रत्यक्षातही आणली. रुग्णांना राष्ट्रध्वज देण्यात आले आणि बाल्कनीत येण्याची सूचना देण्यात आली. त्याचवेळी डॉक्‍टर, नर्स तसेच रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारातील ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी रुग्णांना जिलेबी आणि सामोसे देण्यात आले. 
स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे रुग्ण समाधानी होते. कोरोना झालेल्यांपासून अनेक जण दूर असतात. समाजापासून दूर झालो अशी त्यांच्यात भावना निर्माण होते. त्यामुळे त्यांना या सोहळ्यात सहभागी करुन त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला. त्यामुळे रुग्णांचे मनोधैर्य ऊंचावण्यासही मदत झाली, असे डॉक्‍टरांनी तसेच महापालिकेतील आधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

''मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण... ''; उद्धव ठाकरेंनी घातली मोठी अट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT