Swapna Patkar_ED Office 
मुंबई

Patra Chawl case : स्वप्ना पाटकर यांची पुन्हा ईडी चौकशी; कार्यालयात दाखल

याप्रकरणी खासदार संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून सुरु आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची याप्रकरणी चौकशी सुरु असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. (Patra Chawl Land case Scam witness Swapna Patkar admitted to ED office)

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांनी स्पप्ना पाटकर यांच्या नावे पैसे स्विकारल्याचा गंभीर आरोप पाटकर यांनी केला आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या त्या प्रत्यक्षदर्शी आहेत तसेच त्यांनी संजय राऊत यातील प्रमुख आरोपी असल्याचंही म्हटलं आहे. पाटकर यांच्या या दाव्यामुळं संजय राऊत अडचणीत आले असून त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

यापूर्वी देखील स्वप्ना पाटकर यांची ईडीकडून चौकशी झाली होती. संजय राऊत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. यासंदर्भात पोलिसांत गु्न्हा देखील झाला होता. त्यानंतर या संदर्भात आता पुन्हा एकदा पाटकर यांची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत कोर्टाकडून वाढ करण्यात आली असून ही कोठडी ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT