मुंबई

कल्याणचा पत्रिपूल मार्चअखेरीस खुला होणार

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम भागाला जोडणारा पत्री पूल मार्च अखेरीपर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे अधिकारी अनिल गायकवाड यांनी आज या कामाची संयुक्त पाहणी केली. या पुलाच्या कामात असलेल्या तांत्रिक; तसेच इतर सर्व अडचणी दूर झाल्याची माहिती या वेळी खासदार शिंदे यांनी दिली. 

मागील वर्षापासून या पुलाचे काम सुरू आहे. परंतु विविध तांत्रिक आणि इतर अडचणींमुळे या कामाला काहीसा विलंब होत होता. नवीन पुलाच्या दोन्ही दिशेला फायलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यावर टाकल्या जाणाऱ्या गर्डरचे काम हैदराबादमध्ये करण्यात आले आहे.

रेल्वेचे अधिकारी तसेच राईट संस्थेचे अधिकारी याबाबत हैदराबादला जाऊन गर्डरची तपासणी करतील. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावरच हा गर्डर प्रत्यक्ष जागेवर टाकण्यात येईल. हा गर्डर टाकण्यासाठी रेल्वेला दोन मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत. येत्या महिनाभरात याच ठिकाणी तिसऱ्या पुलाच्या कामाची सुरुवात होईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन; धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं होतं का?

Viral Video: जत्रेतल्या पाळण्यावर तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हायरल व्हिडिओ

UPI Transaction: अखेर संभ्रम संपला! यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं, महत्त्वाची माहिती समोर

ATM Firing Incident :'एटीएम'बाहेरच तरूण व्यावसायिकावर गोळीबार; सहा लाखांची रोकड अन् दुचाकीही पळवली

Latest Marathi News Live Update: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची एकनाथ खडसेंची मागणी

SCROLL FOR NEXT