Payal-Tadvi
Payal-Tadvi 
मुंबई

आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश आज सत्र न्यायालयाने दिला. डॉ. पायल यांची हत्या झाल्याचे दर्शवणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले.

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मेहरे, अहुजा आणि खंडेलवाल यांना आज अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश आर. एम. सद्रानी यांच्यापुढे हजर करण्यात आले. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आरोपींची चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. काही साक्षीदारांनी महत्त्वाची जबानी दिली असून, त्याबाबत अधिक माहिती घ्यायची आहे. आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे त्यांना पोलिस कोठडी द्या, अशी मागणी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केली. आरोपींचे वकील आबाद पोंडा यांनी सरकारी वकिलांच्या मागणीला विरोध दर्शवला. 

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मागास वर्गातील असल्यामुळे डॉ. पायल यांना वरिष्ठ डॉक्‍टर सतत जातिवाचक शेरेबाजी करत होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT