डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झाला आहे. Sakal
मुंबई

Dombivli News : गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल 1 एप्रिल पासून बंद; पूल धोकादायक असल्याने बंदचा निर्णय

डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dombivli News - डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डोंबिवलीतील नागरिक दररोज या पादचारी पुलावरून पूर्व, पश्चिम भागात ये जा करत असतात.

मध्य रेल्वेतर्फे रेल्वे मार्गावरून गेलेल्या अनेक रेल्वे उड्डाण, पादचारी पुलांचे यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पुलांमध्ये डोंबिवलीतील नेहरू मैदानाजवळील गणेश मंदिर ते डोंबिवली पश्चिमेला भावे सभागृहाजवळ जाण्यासाठी सुयोग्य असलेला पादचारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल मुंबईतील पवई येथील भारतीय प्राद्योगिक संस्थेच्या संरचनात्मक अभियंता विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे.

रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने डोंबिवलीतील पादचारी पुलाची पाहणी केली, त्यावेळी हा पूल पादचाऱ्यांना नियमित येजा करण्यासाठी सोयीस्कर नसल्याचे आणि पूल धोकादायक असल्याचे रेल्वे अभियंत्यांच्या निदर्शनास आले.

रेल्वेच्या वरिष्ठांच्या आदेशावरून तातडीने या पुलाची देखभाल दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या 1 एप्रिलपासून पादचारी पूल नागरिकांना येजा करण्यासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील अनेक नागरिक बाजारातील खरेदी, गणेश मंदिरात येण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी नेहरू रस्त्यावरील रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा वापर करत होते. हा पूल बंद होणार असल्याने नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून किंवा ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरून डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT