Mumbai Railway sakal
मुंबई

Mumbai Railway : रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा! ओव्हरहेड वायरमध्ये पेंटाग्राप अडकला

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान पुन्हा एकदा कारशेडला जाणाऱ्या लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान पुन्हा एकदा कारशेडला जाणाऱ्या लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याची घटना घडली, त्यामुळे जलद मार्गावरील लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. या घटनमुळे मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल सेवा विस्कळीत होऊन एकामागे एक लोकल सेवा उभ्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,गुरुवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास डोबिवली स्थानकातून सुटलेली रिकामी लोकल कल्याण कारशेडला जात होती. कल्याण स्थानकांवर येत असताना ठाकुर्ली ते कल्याण स्थानकादरम्यान क्रॉसओव्हर करत असताना ओव्हर हेड वायरमध्ये लोकलचा पेंटाग्राफ अडकून तुटला. त्यामुळे लोकलमधील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी पोहचलेले आहे. तसेच मध्य रेल्वेकडून पेंटाग्राफ तुटलेल्या लोकलला इंजिन जोडून ती कल्याण कारशेडमध्ये नेण्यात आली. मात्र,घटनेमुळे मागून येणाऱ्या मेल- एक्स्प्रेससह जलद उपनगरीयल लोकल गाड्या अडकडून पडल्या होत्या.

तसेच रेल्वेने जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सेवांवर याच्या परिणाम झाला होता. हा बिघाड दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी दुरुस्त करण्यात आला. मात्र, तासाभरात रेल्वेच्या वाहतुकीचे पूर्णता तीन तेरा वाजले होते.

त्यामुळे अनेक लोकल सेवनाचा वेळापत्रकावर मोठा परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान अशी घटना घडली होती, तेव्हाही प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. रेल्वेच्या सततच्या बिघाडामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभावर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

PSI Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार; पोलिस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाणवर पुण्यात गुन्हा दाखल

NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

SCROLL FOR NEXT