...'या' महापालिकेकडून दुकाने सरसकट सूरू ठेवण्यास परवानगी; व्यापाऱ्यांना दिलासा! 
मुंबई

...'या' महापालिकेकडून दुकाने सरसकट सुरु ठेवण्यास परवानगी; व्यापाऱ्यांना दिलासा!

दिपक घरत

पनवेल : सध्यस्थितीत सम-विषम पद्धतीने सुरु असलेली दुकाने सरसकट सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे आता पनवेल महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सरसकट दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिकेच्या या निर्णयावर व्यापारी असोसिएशनने समाधान व्यक्त केले असून, लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना आगामी गणेशोत्सव काळात पालिकेच्या या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे मत व्यापारी असोशियनचे कमल कोठारी यांनी व्यक्त केले आहे.

पनवेल महापालिकेकडून याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकातून पनवेल महापालिका हद्दीतील कोव्हिड -19 ची परस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकांकडून होत असलेल्या मागणीमुळे सरसकट दुकाने उघडी ठेवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र असे असले तरी मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स जिम तसेच स्विमिंग पूल मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT