Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : बांगलादेशातून मुंबईत बेकायदेशीररित्या रॅकेट चालवणाऱ्या व्यक्तीला अटक

बांगलादेशातून बेकायदेशीररित्या मुंबईत आणून रोजगार मिळवून देण्याच्या निमित्ताने रॅकेट चालवणाऱ्या 26 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बांगलादेशातून बेकायदेशीररित्या मुंबईत आणून रोजगार मिळवून देण्याच्या निमित्ताने रॅकेट चालवणाऱ्या 26 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अक्रम नूर नवी शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी आहे.

आरोपी व त्याचा साथीदार शाफिक 20 हजार रुपयांत बांगलादेशी नागरिकांना अवैध्यरित्या मुंबईत आणून त्यांना रोजगार देत होता. तसेच भारतातून कमवलेली रक्कम बांगलादेशात अवैध्यरित्या पाठवण्याचेही काम करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

कार्यपद्धती

अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात वास्तव्यास होता. आरोपी स्वतःही बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. इथे आल्यानंतर आरोपीने त्याचा साथीदार शफीक याच्यासह तेथील नागरिकांना बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आणण्यास सुरू केले. भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश देऊन मुंबईत परिसरात कामधंदा मिळवून देण्याचे काम अक्रम करत होता.

त्यासाठी तो प्रति व्यक्ती 20 हजार रुपये घेत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. तसेच अक्रम कमिशन घेऊन त्याद्वारे बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात हस्तांतरित करण्याचे देखील काम करत होता.

पोलीस कारवाई

अक्रम शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीमार्फत अक्रमशी संपर्क साधण्यात आला. अक्रम शिवडी येथे आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. चौकशीत तो व त्याचे दोन मित्र वडाळा येथील बरकत अली दर्ग्यामागे भाडे तत्त्वावर राहात असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन झडती घेतली. आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम, कोलकाता ते मुंबईचे विमान तिकीट सापडले आहे. आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता तो बांगलादेशातील अनेक नागरिकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT