Fake Call esakal
मुंबई

Mumbai News : 'एकता नगरमध्ये २-३ आतंकवादी आलेत...'; पोलीसांनी कंट्रोल रुमला फोन करणाऱ्याला घेतलं ताब्यात

२६/११ ला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे

रोहित कणसे

मुंबई : २६/११ ला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून एकता नगर येथे आतंकवादी आल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या काॅलने एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान फोन करणाऱ्या व्यक्तीने मानखुर्द पोलीस चौकी, एकता नगरमध्ये २-३ आतंकवादी आले असून त्यांची भाषा समजत नसली तरी त्यांचे काहीतरी प्लॅनिंग सूरू आहे. तसेच त्यांच्याकडे बॅगा असल्याचे कॉल करून फोन करणाऱ्या व्याक्तिने सूचित केले होते. हा कॉल केल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने फोन बंद करून ठेवला होता.

दरम्यान या प्रकरणी किशोर ननावरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तपासादरम्यान हा फोन कॉल करण्यात आला तेव्हा हा व्यक्ती दारूच्या नशेत होता असे समोर आले आहे.

तो विजय बार येथून दारू पिऊन घरी जात असताना, एका इसमाने फोन करण्याकरिता त्याचा मोबाईल मागितला होता, सदर इसमाने कोणाला फोन लावला हे माहित नसल्याचा दावा ननावरे यांनी केला आहे.

संभाषण झाल्यानंतर फोन करणारा व्यक्ती घराजवळ सोडून गेल्याचा दावा ननावरे याने केला आहे. दरम्यान या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT