mstrc 
मुंबई

खोली साहेबांची; मुक्काम पीएचा!

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटीच्या महाराष्ट्र वाहतूक भवानातील खोली क्रमांक ६५ ही एसटीच्या अध्यक्षांसाठी राखीव असतांना माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे खासगी स्विय सहाय्यक अशोक गव्हाने यांनी जवळपा दीड वर्षे मुक्काम या खोलीत केल्याचे उघडकीस आले आहे. मनोरा आमदार निवास पुर्नंबाधणीसाठी रिकामे केल्यापासून त्यांनी या खोलीचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खोलीचे नुतनीकरण करून त्यामध्ये वातानुकूलित सुविधाही देण्यात आल्या होत्या. तसेच खोलीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी नियुक्त केलेल्या शिपायालाही अतिरीक्त कामाची खैरात वाटल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, माजी अध्यक्षांच्या हवाल्यानेच ही खोली स्वीय सहाय्यकांना दिल्याचे स्थापत्य व अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश पडलवार यांनी सांगितले. 

मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र वाहतूक भवनातील सहावा माळ्यावरील खोली नंबर ६५ हे एसटीच्या अध्यक्षासाठी राखीव आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात एसटीचे माजी अध्यक्षाचा कारभार माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे असल्याने त्यांनी खोलीचा वापर केला नाही. त्यांच्याऐवजी गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने येथे नियमीत मुक्काम ठोकल्याचे उघड झाले आहे. लोकसभा, विधानसभा आणि राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान शासकीय सेवा घेण्यास मनाई असतानाही स्वीय सहायकाने सदर खोलीचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. या खोलीतील वातानुकूलित सुविधांचा खर्च एसटीच्या तिजोरीतून करण्यात आल्याने महाराष्ट्र वाहतूक भवनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु आहे. 

या खोलीसाठी एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना ५०० रूपये, तर खासगी व्यक्तींना १००० रूपये प्रतिदिन शुल्क भरावा लागतो. मात्र, गेल्या पाच वर्षात ही खोली एसटीच्या अध्यक्षांसाठी राखीव केल्याने या खोलीत खासगी स्वीय सहाय्यकाने पूर्णवेळ मुक्काम ठोकला होता. 

कोण आहे खासगी स्वीयसहाय्यक?
औरंगाबाद येथील मूळ रहिवासी असलेले अशोक गव्हाणे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे खासगी स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसाठी रिकामे केल्याने त्यांनी एसटीच्या महाराष्ट्र वाहतूक भवनातील सहाव्या माळ्यावरील खोली नंबर ६५ मध्ये आपला मुक्काम हलवला होता.

एसटीचे माजी अध्यक्षांनी सांगितल्याने त्यांच्या स्विय सहाय्यकांना ही खोली दिली होती. मनोरा आमदार निवास रिकामे झाल्यानंतर ते या खोलीत राहत होते. एसटीचे अध्यक्ष, त्यांचे नातेवाईक आणि स्वीय सहाय्यकांना खोली दिल्या जाते. 
-प्रकाश पडलवार, कार्यकारी अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी, एसटी.

खोलीच्या संदर्भात माहिती नाही. त्यासंदर्भात कार्यकारी अभियंता पडलवार हे माहिती देतील
- राजेंद्र जवंजाळ, महाव्यवस्थापक, एसटी 
बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT