मुंबई

केंद्र सरकारच्या GST कायद्यातल्या अटकेसंबंधी तरतुदी विरोधात हायकोर्टात याचिका

- सुनीता महामुणकर

मुंबईः केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कायद्यातील अटकेसंबंधी तरतुदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

जीएसटी कायद्याच्या तरतुदी केंद्र सरकारने निश्चित केल्या आहेत. अनेक व्यावसायिक कंपन्या चुकीच्या पद्धतीनं इनपूट टॅक्स क्रेडिटवर दावा करतात. अशा पद्धतीला प्रतिबंध करण्यासाठी या कायद्यात कठोर तरतुदी लावण्यात आल्या आहेत. मात्र यामधील अनेक तरतुदीमध्ये आणि प्रामुख्याने अटकेसंबंधीच्या तरतुदीत त्रुटी आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.

व्यावसायिक अभिषेक रस्तोगी यांनी न्यायालयात ही याचिका केली आहे. केंद्रीय जीएसटी कायद्यातील कलम 69 मुळे अधिकारांचा गैरवापर होऊ शकतो. या कलमानुसार जीएसटी आयुक्त एखाद्या व्यक्तीवर अटकेची कारवाई करु शकतात.  जर संबंधित व्यक्तीने नियमांचे पालन केले नाही असे आयुक्तांना वाटले तर ते त्यावर कारवाई करू शकतात, असे यामध्ये म्हटले आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला पाच वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. त्यामुळे या अधिकाऱ्यांमार्फत गैरवापर होण्याची शक्यता आहे, असे याचिकादाराने म्हटले आहे.

त्याचबरोबर कलम 132 (1) मध्येही याचपद्धतीने पाच कोटी रुपयांच्या करापर्यत अटकेची आणि जामीन न मिळण्याची तरतूद आहे. या दोन्ही तरतुदींना न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

या तरतुदीमध्ये अटकेची कारवाई अधिक ठळकपणे असून करभरणाबाबत अधिक विचार नाही. अटकेची कारवाई जे करचुकार आहेत त्यांच्यावर असायला हवी. कारवाई करावी असं वाटले म्हणून कारवाई होता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य महत्वाचे असून त्यावर अतिक्रमण होता कामा नये, असेही याचिकेत म्हटले आहे.  देशभरात बोगस कागदपत्रांबाबत आतापर्यंत सुमारे 140 जणांवर अटक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 1488 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)


Petition Bombay High Court against detention provisions Central Government GST Act

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT