Petrol Diesel Prices esakal
मुंबई

Petrol Diesel Prices : सर्वसामान्यांचा खिसा होणार अजूनच रिकामा ! पेट्रोल - डिझेलचे भाव वाढणार ?

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली असून दरवाढीची भीती वाढली आहे

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Prices : आधीच वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके बसत आहेत.यातच आता महागाईचा अजून एक चटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. तो म्हणजे भारतात येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढू शकतात. यामळे सर्वसामान्य नागरिकांचा अधिच रिकामा असलेला खिसा अजूनच रिकामा होणार का? अशी भीती सर्वांनाच वाटत आहे.

या मागचे कारण म्हणजे, आपल्या देशाला गेल्या वर्षभरात रशियाकडून कमी दरात कच्चे तेल मिळत आहे.अश्यावेळी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील असा अंदाज होता. मात्र प्रत्येक्षात तसे झाले नाही.

मात्र आता समोर आलेल्या महत्वाच्या वृत्तानुसार, रशियाच्या तेलावरील सवलत कमी होणार असून त्याचे दर वाढणार आहेत. पर्यायी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली असून दरवाढीची भीती वाढली आहे.

तर दुसरीकडे भारतीय पेट्रोलियम कंपन्या यातून मोठा नफा कमवत असल्याने सवलतीच्या कळतही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नव्हते. मात्र आता ते वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT