petrol pump file photo
मुंबई

Petrol price: न्यू यॉर्क पेक्षा मुंबईत दर दुप्पट

सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल

दीनानाथ परब

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel prices) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. मुंबईत शनिवारीच पेट्रोलच्या दराने शतक गाठले. प्रतिलिटर पेट्रोलरचा दर (petrol rate) १०० रुपयापर्यंत पोहोचला होता. अजूनही हे दर कमी झालेले नाहीत. उलट त्यात अजून वाढ होत आहे. (Petrol now costs almost twice as much in Mumbai than New York)

सोमवारी मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर १००.४७ रुपये ($1.39) होता. आज हाच दर १००.७८ रुपये आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर दुप्पट आहेत. इंडियन ऑईल कॉर्पच्या डाटानुसार, मुंबईत पेट्रोलचे रिटेल दर या वर्षात ११ टक्क्यांनी वाढले आहेत. न्यू यॉर्क स्टेट एनर्जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्राधिकरणाचे जे आकडे आहेत, त्यावरुन ब्लूमबर्गने केलेल्या कॅलक्युलेशननुसार न्यूयॉर्कमध्ये पेट्रोलचा दर $0.79 आहे.

नरेंद्र मोदी प्रशासनाने सातत्याने सेल्स टॅक्स वाढवल्यामुळे मागच्यावर्षी भारतात पेट्रोलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या राज्यनिहाय बदलत जातात. वॅट आणि अन्य स्थानिक करानुसार हे दर बदलतात. देशात राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक वॅट कर आकारला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT