मुंबई

Petrol price hike | इंधनाची दरवाढ कायम; दोन दिवसात पेट्रोल- डिझेलचा पुन्हा भडाक

प्रशांत कांबळे

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मुंबईकरांची सरसकट लोकल प्रवासी सेवा बंद आहे. त्यामध्ये दुसरीकडे इंधन दरवाढ कायम असल्याचे दिसून येत आहे. महिन्याभऱ्यापासून इंधनाचे दर अस्थिर असून, गेल्या दोन दिवसात सातत्याने दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलचा, डिझेल उच्चांक गाठला आहे. पेट्रोल मध्ये 58 पैसे आणि डिझेल मध्ये 64 पैशाने वाढ झाली आहे. ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास काहीच दिवसात मुंबईत पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

मंगळवारी प्रजासत्ताक दिनीच इंधन कंपन्यांचे पुन्हा
33 ते 34 पैशाने दरवाढ झाले. त्यानंतर बुधवारी सुद्धा ही दरवाढ कायम आहे. गेल्या महिन्याभरात पाच वेळा इंधनाचे दर वाढले, त्यानंतर ही सहावी दरवाढ आहे. मंगळवारी पेट्रोल 34 तर डिझेल 37 पैशांची वाढ झाली तर बुधवारी पेट्रोल मध्ये 24 पैसे तर डिझेलचे 27 पैशाने दरवाढ झाल्याने मुंबईकरांना आता प्रतिलिटर पेट्रोल 92.86 रुपये तर डिझेल 83.30 रुपयांमध्ये विकत घ्यावे लागणार आहे.

यापूर्वी 18,19 जानेवारी रोजी पेट्रोलच्या दरात तब्बल 48 पैसे तर डिझेल दरामध्ये 53 पैशांची वाढ झाली. तर 20,21 जानेवारी दोन दिवस दर स्थिर होते.  त्यानंतर पुन्हा 22,23 जानेवारी या दोन दिवसांमध्ये पेट्रोल पुन्हा 48 पैसे आणि 53 पैशाने डिझेल वाढले. त्यानंतर दर स्थिर झाल्यानंतर, 26 जानेवारी पासून पुन्हा आता दरवाढ सुरू झाली आहे. त्यामुळे 18 जानेवारी पुर्वी असलेले पेट्रोलचे 91.32 रुपयांमध्ये 1.54 रुपये वाढले आहे. तर डिझेलचे 81.6 रुपयांमध्ये तब्बल 2.24 रुपये वाढल्याने, मुंबईकरांचा वाहन प्रवास आता चांगलाच महागण्याची शक्यता आहे. 

राज्यातील जिल्ह्याचे दर (प्रति लिटर)
जिल्हे              - पेट्रोल                   - डिझेल 
अमरावती -        94.29 -                 84.76
बीड -                94.49 -                 83.63
गोंदिया -            94.4 -                    83.21 
मुंबई उपनगर -   93.2 -                   83.45
नांदेड -              94.84 -                 83.98
जालना -             83.10  -                83.10
परभणी -            94.52 - 83.64
रत्नागिरी - 94.27 - 83.40
सिंधुदुर्ग - 94.40 - 83.55
----------
देशातील महानगरातील इंधनाचे दर
मुंबईतील पेट्रोलचा दर 92.86 रूपये आहे. त्याप्रमाणे चेन्नई 94.30, दिल्ली 86.30, कोलकात्ता 87.69, बंगळुरू 94.50, चंदीगड 83.9 रूपये तर झिझेलच्या दरांमध्ये मुंबई 83.30 रूपये, त्याप्रमाणे चेन्नई 82.30, दिल्ली 76.48, कोलकाता 80.8, बंगळुरू 82.00, चंदीगड 76.23 रूपये दर होते. 
--------------- 
नांदेड मध्ये पेट्रोल तर अमरावती मध्ये डिझेलच्या दराचा भडका

बुधवारी राज्यभरात सर्वाधिक पेट्रोलचा दर नांदेड जिल्ह्यात असून 94.84 रुपयांवर पोहचले आहे. तर डिझेल सर्वाधिक अमरावती मध्ये महागडे झाले असून, 84.76 रुपयांवर पोहचले आहे. भविष्यात इंधनामध्ये आणखी दरवाढ होऊन सर्वसामान्यांचा प्रवास आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

 Petrol price hike Fuel price hike sustained Petrol-diesel explosion again in two days

------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT