मुंबई

गॅस एजन्सीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक; बनावट संकेतस्थळाच्या सहाय्याने फसवणूक

अनिश पाटील

मुंबई, ता. 02 :  गॅस एजन्सी तसेच त्यासाठी मिळणारे लाखोंचे सरकारी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी त्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार केले होते. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

छत्तीस वर्षीय रवीकुमार रविदास आणिपस्तीस वर्षीय डॉली शर्मा यांना नुकतीच याप्रकरणी बिहार येथून अटक करण्यात आली. याशिवाय आणखी दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तक्रारदार गोरेगाव येथील रहिवासी असून ते एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. समाज माध्यमांवर त्यांनी एक जाहिरात पाहिली होती. त्यात गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय त्यासाठी मिळणारी 30 लाखांची सबसिडीही मिळवून देणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. त्यांनी संबंधीत लिंकवर क्लीक केले व तेथील फॉर्म पत्नीच्या नावे भरला. दोन दिवसानंतर त्यांना डीके शर्मा नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने आपण एलपीजी वितरक चयन येथून बोलत असल्याचे सांगितले. त्याने तक्रारदाराला एजन्सी देण्यासाठी निवडले असल्याचे सांगितले. एजन्सी व 30 लाख रुपयांचे सरकारी अनुदान देण्यासाठी आरोपी विविध फी भरायच्या असल्याचे सांगितले. त्यात ना हरकत प्रमाणपत्र, प्रोसेसिंग फी यासाठी तीन लाख 66 हजार रुपये तक्रारदाराने भरले. त्यानंतर तक्रारदाराला कन्फर्मेशन लेटर मिळाले. त्याची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या पत्त्यावर त्याने जाऊन पाहणी केली असता तो बोगस असल्याचे निष्पन्न झाले. पुढे संकेतस्थळही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.

त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पटना येथून रवीकुमार रविदास आणि डॉली शर्मा यांना अटक केली. याप्रकरणी आणखी दोघांना पश्चिम बंगाल येथूनही अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मुख्य आरोपींनी संकेतस्थळ तयार करण्यात मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी अशा प्रकारे देशातील अनेकांना फसवल्याचे निष्पन्न झाले आहे. 

phishing attempts by creating fake site of gas agency two under arrest

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT