Arrest sakal media
मुंबई

मॅार्फिंगच्या साहाय्याने सेलिब्रिटींना धमकावणाऱ्याला बिहारमधून अटक

अनिष पाटील

मुंबई : माॅर्फिंगच्या साहाय्याने सेलेब्रीटींचे (celebrities) अश्लील व्हिडिओ व छायाचित्र तयार करून ते समाज माध्यमांवर (Social Media) प्रसारीत करण्याची धमकी देऊन खंडणी (ransom) मागणा-या टोळीशी संबंधीत एकाला बिहार मधून अटक करण्यात आली आहे. आरोपीने अनेक सेलेब्रिटींना अशा प्रकारे धमकावल्याचा संशय पोलसांना आहे. ( photo Morphing of celebrities case one arrested from bihar )

सेलीब्रीटींचे माॅर्फिंगच्या साहाय्याने अश्लील व्हिडीओ तयार करून त्यांना समाज माध्यमांवर धमकवल्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. मुंबईतील एका प्रसिद्ध सेलेब्रिटीला आरोपीने फेब्रुवारी महिन्यात धमकावले होते. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, तसेच रक्कम न दिल्यास प्रसिद्धी माध्यमांवर माॅर्फ छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्याबाबत या तक्रारदाराच्या भावाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीने धमकावून त्यांच्याकडून नग्न छायाचित्राची मागणी केली होती.

तीन महिना चाललेल्या प्रकारानंतर अखेर याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भादंवी कलम 385, 506 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भोजराज नरवणे याला नुकतीच अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काही ट्वीटर हँडलवरून सेलेब्रीटींचे नग्न छायाचित्र समाज माध्यमांवर वायर करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तांत्रिक तपासाद्वारे उत्तर प्रदेशातील कुरमौल येथून गोविंद कुशवाह(24) याला अटक करण्यात आली आहे. या मागे एक टोळी असण्याचा पोलिसांना संशय आहे. कुशवाह हा सेलेब्रीटींचे अश्लील व्हिडिओ मॅार्फींगच्या साहाय्याने बनवणा-या टोळीच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT