physical abuse girl crime manpada police arrest accused mumbai crime  esakal
मुंबई

Mumbai Crime : घरात ती एकटी असल्याची संधी साधत अत्याचार; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तरुणी एकटीच असल्याचा फायदा घेत एका नराधमाने तिच्याच घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कल्याण परिसरात घडली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - घरात ती तरुणी एकटीच असल्याचा फायदा घेत एका नराधमाने तिच्याच घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कल्याण परिसरात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर गाडे याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात पीडित तरुणी आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत रहाते. तीन वर्षांपूर्वी सदर तरुणीने दहावीच्या परीक्षेचे टेन्शन घेतले होते. यामुळे तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तिच्यावर उओचार सुरू असून तिची स्थिती सुधारत होती.

काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती. बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

महिनाभरा पूर्वी सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला. आरडा ओरड केल्याने तो तेथून निघून गेला. मात्र त्याने पीडितेला धमकवल्याने पीडिता घाबरली होती. त्यानंतर काही दिवसांनी सागर ने पुन्हा तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला.

त्याच दिवशी त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सागरने पीडिता घराबाहेर पडली असता भर रस्त्यात तिची छेड काढली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितला.

पीडितेच्या भाऊजीने सागर ला जाब विचारला असता त्याने व त्याच्या कुटुंबाने माफी मागितली. मात्र त्यानंतर काही दिवसानी सागरने कुटुंबाला धमकावले. अखेर या घडल्या प्रकाराची पीडीतेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सागर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT