मुंबई

अखेर त्या वाईट निर्णयाची वेळ आलीच! मुंबईत आजपासून पाणीकपातीचे नियोजन... वाचा सविस्तर

समीर सुर्वे


मुंबई : मुंबईत बुधवारपासून (ता.5) 20 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. या दरम्यान काही भागांत पाणी मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता असल्याने पालिकेने विभाग स्तरावर नियोजन केले आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 34.95 टक्के पाणीसाठा जमा आहे. जुलैअखेरपर्यंत तलावांमध्ये 80 टक्क्यांंपेक्षा जास्त पाणीसाठा जमा होणे अपेक्षित होते. त्यामुळे पाणीबचतीसाठी महापालिकेने 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला दररोज 3750 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, आता 750 दशलक्ष लिटर पाणी कमी मिळणार आहे. 

कपातीचा सर्वाधिक फटका डोंगराळ भागातील घरांना, तसेच वितरण व्यवस्थेच्या टोकाला असलेल्या नागरिकांना बसणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रभाग पातळीवर नियोजन केले आहे. प्रत्येक प्रभागात एक टॅकर उपलब्ध आहेत.  हे टॅंकर शक्यतो आपात्कालीन सेवांसाठी वापरले जातील. तसेच, ज्या भागांत पाणी मिळणार नाही तेथे टॅंकरद्वारे पाणी दिले जाणार आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

लॉकडाऊनचा फायदा 
लॉकडाऊनमुळे कारखाने, व्यवसाय अद्याप पुर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत. त्यामुळे त्या पाण्याची बचत होणार असल्याने ते पाणीदेखील नागरिकांना मिळू शकणार आहे. 

तलावातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

तलाव

साठा टक्के 
अप्पर वैतरणा 40016 17.62

मोडकसागर

49426 38.34

तानसा

36513 25.17
मध्य वैतरणा 68191 35.24
भातसा 281710 39.29
विहार 21994 79.41

तुळशी

8046 100.00
     

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT