plasma
plasma 
मुंबई

 दुर्दैवी! मुंबईत प्लाझ्मा दान एक टक्काही नाही; पालिका करणार कोविड विजेत्यांना संपर्क.. 

समीर सुर्वे

मुंबई: कोविड रुग्णांवरील उपचारात वरदान ठरु शकेल अशा प्लाझ्मा थेरपीकडे कोविड विजेत्यांनी पाठ फिरवली आहे. मुंबईतील 59 हजार 26 जणांनी कोविडवर मात केली केली आहे. मात्र,प्रत्यक्षात एक टक्का व्यक्तींनीही प्लाझ्मा दान केलेले नाही. 

कोविड वर मत केलेल्या रुग्णाच्या रक्तातील  प्लाझ्मा(रक्तद्रव्य ) रुग्णांना दिले जातात. साधारणतः अत्यावस्था असलेल्या रुग्णांवर या पद्धतीने उपचार केले जातात. जगभरात ही उपचार पद्धती वापरली जात आहे.मुंबई मध्ये या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने तयारी हि केली. मात्र आजारावर मात केलेल्या रुग्णांकडून प्रतिसाद मिळत नाही. आता  पर्यंत फक्त  100 कोविड विजेत्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. 

महापालिकेच्या नायर, शिव, कस्तुरबा,सेवन हिल्स या रुग्ण्यालायात  प्लाझ्मा थेरपी ची सोय करण्यात आली आहे, मात्र कोविड कोविड विजेत्यांकडून प्रतिसाद मिळत नाही 

पालिका संपर्क करणार:  

कोविड विजेत्यांना आता पालिकाच संपर्क साधणार आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयातील वॉर रुम मार्फत संपर्क साधण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र,प्लाझ्मा दानासाठी बळजबरी करता येणार नाही. त्यामुळे या नागरीकांंंंना प्लाझ्मा दानाचे महत्व पटवून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले.

नक्की काय होते: 

-- कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेल्या व्यक्तींच्या रक्तद्रवात प्रतिपींड तयार झालेली असतात.

-- ही प्रतिपींड रुग्णाच्या शरिरात रक्तद्रवाच्या माध्यमातून पोहचवली जातात.

-- ही प्रतिपींंड एखाद्या लसी प्रमाणे काम करु  आजारी व्यक्तीच्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करतात. 

संपादन : अथर्व महांकाळ .

plasma donation in mumbai is not even 1 percent 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT