File Photo
File Photo 
मुंबई

अलिबाग, एलिफंटा बेटापर्यंतचा प्रवास सुखकर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : दक्षिण मुंबईतील रेडिओ स्टेशननजीक 2016 मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या जेट्टी व प्रवासी टर्मिनलला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यसंवंर्धन व बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी 2 वर्षांचा असून या प्रकल्पाला वित्त विभागाकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून लवकरच निविदा मागवण्यात येतील व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नवीन जेट्टी उभी राहिल्यानंतर अलिबाग आणि एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटी नवीन जेट्टीमधून धावतील येथे एक प्रतीक्षा कक्ष आणि आधुनिक सुविधांसह एक नवीन टर्मिनलदेखील असेल.

या प्रकल्पासाठी भारतीय नौदल, तटरक्षकदल, पुरातत्त्व विभाग-मुंबई, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण या सर्व संस्थांच्या परवानग्या मिळाल्या असून ही जेट्टी रेडिओ क्‍लबपासून सुमारे 200 मीटर अंतरावर बांधण्यात येईल. नवीन टर्मिनल इमारतीत वाहनतळही असेल. या जेट्टीमध्ये एकूण आठ धक्के असून त्यातील एक धक्का नौका मालकांसाठी राखीव असेल, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या म्हणण्यानुसार वर्षाला 26 लाखांपेक्षा जास्त लोक गेटवे ऑफ इंडियावर नौका सफरीसाठी येतात. दरवर्षी या गर्दीच्या संख्येत 10 टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. आता असलेली जेट्टी या गर्दीचा विचार करता अपुरी पडते.

नव्या टर्मिनल इमारतीमध्ये 5050 चौरस फुटांचे प्रतीक्षालय, 100 लोकांना बसण्याची आसनव्यवस्था व एकाच वेळी 1000 लोकांना सामावून घेण्याची क्षमता असल्याने लोकांना यात सहज प्रवेश मिळू शकेल. नव्या जेट्टी व टर्मिनलमुळे रायगड व एलिफंटाकडे पर्यटकांचा ओघ वाढेल व पर्यटनास चालना मिळेल. या प्रकल्पासाठी आवश्‍यक सर्व परवानग्या मिळाल्या असून प्रकल्पाचा आराखडादेखील तयार असल्याने प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. 
- अस्लम शेख,
वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास मंत्री
 

A pleasant trip to Alibauga, Elephanta Island

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT