मुंबई

जलवाहिनी फुटल्याने कल्याणमधील नागरिकांचे हाल

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : कल्याण-डोंबिवली महापालिकेची बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी मंगळवारी (ता. ११) पहाटे फुटली. शहाड येथे वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जाऊन आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता. याचा फटका कल्याण पूर्व- पश्चिम भागाला बसून सकाळी पाणीपुरवठा झाला नाही. अचानक पाणी न आल्याने नागरिकांचे हाल झाले. सकाळी १० वाजेपर्यंत पालिकेने वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत पाणीपुरवठा पूर्ववत केला.

महापालिकेच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्राला येणारी जलवाहिनी रात्री अचानक शहाड येथे मोठ्या प्रमाणात लिकेज झाली. हजारो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती मिळताच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सकाळी सहा वाजता पुरवठा बंद करत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याने काळोखात दुरुस्तीचे काम करणे अवघड होते. तसेच जलवाहिनीतील पाण्याच्या प्रवाहाला उच्चतम वेग असल्याने हे पाणी तत्काळ थांबविणे अशक्य होते. जोपर्यंत जलवाहिनी रिकामी होत नाही, तोपर्यंत पालिका पाणीपुरवठा अधिकारी, कंत्राटदार यांना दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य नव्हते. त्यामुळे या कामास थोडा विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

उल्हास नदीतून शहाड येथे पाणी उचलून ते बारावे येथे जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. जलवाहिनीतील अतिउच्चतम दाबामुळे किंवा व्हाॅल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाला की अशा घटना घडतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जलवाहिनीतील पाण्याची पातळी सकाळी कमी झाल्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. कल्याण शहराला पाणीटंचाईची झळ बसणार नाही, या दृष्टीने तत्काळ जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला. सकाळच्या वेळेत कल्याण शहराला पाणीपुरवठा झाला नसला, तरी संध्याकाळी नियमित पाणीपुरवठा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Deal : जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, 'होर्मुझ' पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा

थेट भेट : ‘भारताची ग्रोथ-स्टोरी अजूनही मजबूत’

T20 World Cup मध्ये हरमनप्रीत कौर बनली भारताची अव्वल फलंदाज, पाकिस्तानविरुद्ध खेळताना मोडला मिताली राजचा विक्रम

अर्थभान : पैशांचे सोंग आणता येत नाही...

करकायदा : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी

SCROLL FOR NEXT