PM Modi interaction with youth students in Mumbai in metro devendra fadanvis shred video  
मुंबई

Video : मुंबई मेट्रो प्रवासादरम्यान PM मोदींचा विद्यार्थ्यांना खास प्रश्न; म्हणाले, 'तुम्ही 15 मिनिटं…'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील अनेक पायाभूत सुविधा इतर विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना 38,000 कोटी रुपयांहू अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ( PM Modi In Mumbai)

यासोबतच त्यांनी सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चाची मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2A आणि 7 देशाला समर्पित केली. यादरम्यान PM मोदींनी मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंद देखील लुटला.

मेट्रोच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधेरीच्या गोदिंवली ते मोगारापाडा असा मेट्रोतून प्रवास केला यादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या घटाकांशी चर्चा देखील केली.या प्रवासादरम्यान मोदींनी तरुण विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला. याचा व्हिडीओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला आहे.

PM मोदी विद्यार्थ्यांशी काय बोलले?

या प्रवासादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांना मेट्रोमुळे तुमचा रोजचा किती वेळ वाचेल असं विचारलं, यावर विद्यार्थ्यांनी त्यांचे 45 मिनिटं रोजचे वाचतील, असं उत्तर दिलं. यानंतर मोदींनी या वेळेचा काय उपयोग कराल? असं विचारलं.

विद्यार्थ्यांनी अभ्यास करणार असल्याचे सांगितले. यानंतर मोदींनी माझ्यासाठी एक काम कराल का? वेळ वाचत असेल तर माझ्यासाठी 15 मिनिटं योग कराल का? यावर विद्यार्थ्यांनी हो नक्की करू असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितल. मोठं कठीण काम आहे, ते स्वतःच करावं लागतं असं म्हणताच विद्यार्थ्यानी नक्की योग करण्याचं आश्वासन दिलं.

या मेट्रो प्रवासात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी होते. दरम्यान यानंतर फडणवीसांनी ही व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT