PM Modi Road Show Ghatkopar Mumbai Esakal
मुंबई

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

PM Modi Road Show: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी सहापासून घाटकोपर ते जागृतीनगर या मार्गावर मेट्रोची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी सहापासून घाटकोपर ते जागृतीनगर या मार्गावर मेट्रोची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रोने याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये मुंबई मेट्रोने म्हटले आहे की, "सुरक्षेच्या कारणास्तव, जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानकांदरम्यान, संध्याकाळी 06.00 वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहे."

घाटकोपर स्थानक अंधेरी-वर्सोवा मेट्रो सेवा पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असल्याने या निर्णयामुळे हजारो प्रवाशांवर परिणाम होणार आहे. दररोज तीन लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो सेवेचा वापर करतात.

पूर्व मुंबईतील घाटकोपर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित रोड शोच्या आधी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २.५ किमीचा रोड शो घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील श्रेयस सिनेमापासून रात्री ८ वाजता सुरू होईल आणि गांधी मार्केटमध्ये संपेल.

घाटकोपरमधील रोड शो दरम्यान, मुंबई पोलिसांनी वाहतूक बदल केल्याची सूचनाही यापूर्वी जारी केली होती.

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शनपर्यंत एलबीएस रस्ता वाहनांसाठी बंद राहील आणि माहुल-घाटकोपर रस्ता मेघराज जंक्शन ते आरबी कदम जंक्शनपर्यंत दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद राहील.

घाटकोपर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा पंतप्रधान मोदी या रोड शोमध्ये प्रचार करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT