मुंबई

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा पंतप्रधान मोदींना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामातील त्यांच्या सहभागाबाबतच्या आठवणी सांगितल्या. "मी बांग्लादेशच्या बंधुभगिनींना अभिमानाने सांगू इच्छितो की मी 20-22 वर्षांचा असताना बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्या संघर्षामध्ये सहभागी होणं माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनामधील एक होतं. माझं वय तेव्हा 20-22 वर्षे होतं, जेंव्हा मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी बांग्लादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता", असं पंतप्रधान मोदी यांनी दोऱ्यावर असताना सांगितलं. त्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.

"आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली, तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल", असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे लगावला.

बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.

आणखी काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी

बांगलादेश मुक्ती लढ्याचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आठवणीचा दिवस असेल. बांग्लादेशने मला या आयोजनात सहभागी करुन घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारत या गोष्टीमुळे आनंदीत आहे की, भारतात निर्माण झालेली लस बांग्लादेशच्या लोकांच्या उपचाराकरता वापरण्यात येत आहे.

पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात पाकवर निशाणा साधला. एकीकडे व्यापार आणि उद्योगांमध्ये सर्वांना समान संधी आहे. तर दुसरीकडे दहशतवादासारखी आव्हाने आहेत. इथल्या लोकांवरील पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार आम्हाला व्यथित करायचे. अनेक दिवसांपर्यंत या अत्याचारांच्या फोटोंनी झोप लागत नव्हती. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाला समाजातील प्रत्येक वर्गाकडून समर्थन प्राप्त झालं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भुमिका देखील सर्वज्ञात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT