Narendra Modi  esakal
मुंबई

Narendra Modi : पंतप्रधानांचा पुन्हा दौरा! मोदींच्या वारंवार मुंबईत येण्याचे 'हे' आहेत 3 अर्थ

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईत येऊन विविध विकासकामांचं लोकार्पण केलं होतं. आता पुन्हा मोदींचा मुंबई दौरा नेमका कशासाठी? हा प्रश्न पडतोय.

10 फेब्रुवारीला मोदींचा दौरा

मुंबई महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. अंधेरी पूर्व, मुंबईतील मरोळ बोहरा कॉलनीमध्ये बोहरा मुस्लिम समुदायाने स्थापन केलेल्या अल् जामिया तुस सैफिया या विद्यापीठाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. इतकं नाही तर सीएसएमटी-साईनगर-शिर्डी आणि सोलापूर सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेसला मोदी हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

मोदींच्या दौऱ्याचे तीन कारणं

  • १. मुंबई महापालिका निवडणूका

    गेल्या काही दिवसापासून केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांचं लक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूकीवर असल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे. या निवडणुकीचा मुख्य चेहरा पंतप्रधान मोदी असल्याचं या घडामोडीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे या सगळ्या दौऱ्यामागे महापालिका निवडणूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

  • २. बोहरा समाजाची मतं

    आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींचा दौरा महत्वाचा तर आहेच.पण मुंबईत ज्या उद्घाटन कार्यक्रमाला मोदी येणार आहेत त्या भागात मोठ्या संख्येने बोहरा समाज आहे. बोहरा समाजाची मतांची आकडेवारी आणि मागील निकाल पाहता भाजपाकडून मतांची गणितं जुळवण्याच्या अनुषगांने मोदींचा हा दौरा महत्वाचं असल्याचं बोलत जातय.

  • ३. ठाकरे गटाला शह देण्यासाठी...

    मुंबई आणि महापालिकेचा आत्तापर्यंतच इतिहास पाहता ठाकरे गटाचा प्रभाव राहलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील राजकीय समीकरण बदलली. त्यामुळे ठाकरे मुंबईत एकटे पडले आहेत. याच बाबीचा फायदा घेत वेळोवेळी ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. अशात पंतप्रधानांचा पुन्हा मुंबई दौरा आणि शक्तीप्रदर्शन हा ठाकरेंना शह देण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT