Mumbai High Court Sakal media
मुंबई

संकेतस्थळावर राजमुद्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र; हायकोर्टात याचिका

सुनिता महामुनकर

मुंबई : पंतप्रधान सहाय्यता निधी संकलनाच्या संकेतस्थळावर (website) राजमुद्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे छायाचित्र (photograph) लावल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) जनहित याचिका (petition) करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारने (central Government) दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी वकील सुहास ओक आणि वकील सागर जोशी यांच्या मार्फत याचिका केली होती. याचिकेवर आज न्या अमजद सय्यद आणि न्या एस जी डिगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आपत्कालीन परिस्थिती मध्ये आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी या निधी ची निर्मिती सार्वजनिक ट्रस्ट द्वारे करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांनी दिलेली देणगीला आयकर मधून सवलत देण्यात आली आहे.

त्यामुळे पी एम केअर चैरिटेबल ट्रस्ट ला सरकारकडून काहीही योगदान नाही. तरीही त्यावर राष्ट्रीय प्रतीके (राजमुद्रा), तिरंगा आणि पंतप्रधानांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे..जे.कायद्यानुसार गैर आहे असा दावा याचिकेत केला आहे. त्यामुळे संबंधित साहित्य संकेतस्थळावरुन हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत उपस्थित मुद्यांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ता 25 औक्टोबर रोजी होणार आहे।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal आजारी पडला, दोन दिवसात २ किलो वजन झालं कमी; आता कशी आहे तब्येत?

Child Rappelling Kokankada : शिवरायांची वाघीण! कोकणकड्यावरून चिमुकलीचं थरारक रॅपलिंग; महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची आद्याश्री तरी कोण?

Latest Marathi News Live Update : भोरमध्ये रात्रीच्या सुमारास गॅस लीकमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना

Kolhapur Municipal : गुन्हेगारीचा थेट प्रवेश; महापालिका निवडणुकीत गुंड-मटकेवाल्यांची बायकांसाठी उमेदवारीची धडपड

Mutual Fund Rule: मोठी बातमी! म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्ससाठी नियम बदलले, सेबीचा ऐतिहासिक बदल

SCROLL FOR NEXT