मुंबई

'तारीख पे तारीख'मुळे PMC खातेधारक संतप्त..

सकाळ वृत्तसेवा

PMC खातेधार आपले पैसे मिळावे म्हणून हरतऱ्हे प्रयत्न करतायत. अशातच आज मुंबईतील उच्च न्यायालयात PMC बॅंकेसंदर्भातील केसची तारीख होती. याच पार्श्वभूमीवर PMC खातेधारक आज मुंबई उच्च न्यायालयासमोर एकत्रित आलेत. एकत्रित येत PMC खातेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आंदोलन केलंय. 

लवकरात लवकर आपले संपूर्ण पैसे परत मिळाले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा PMC खातेधारकांनी दिला आहे. PMC खातेधारकांकडून 'RBI चोर है'च्या घोषणा देण्यात आल्यात. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर PMC  खातेधारकांकडून  आज आंदोलन करण्यात आलंय.

"हे आमच्या मेहनतीचे पैसे आहेत. कोणतीही चोरीमारी करून कमावलेले हे पैसे नाहीत. कुणाच्या घरात लग्न आहे, कुणाला आजारपणासाठी पैसे हवेत तर कुणाची आयुष्याची संपूर्ण जमापुंजी ही बँकेत अडकली आहे."

- PMC खातेधारक  

अशात पैसे काढता येत नसल्याने PMC खातेधारक आक्रमक झालेत.त्यात आता मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने PMC बँक खातेधारकांचा उद्रेक आज पाहायला मिळाला. PMC घोटाळ्यानंतर  अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पैसे मिळवण्यासाठी हे खातेधारक दररोज वणवण करतायत. यापुढे पैसे मिळण्यासंदर्भात ठोस पावलं उचलली गेली नाही तर आंदोलन आणखी तीव्र झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. 

6500 कोटींहून अधिक गैरव्यवहार!

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने मोठी माहिती दिली आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने सांगितले आहे. बँकेत झालेला गैरव्यवहार हा 4355 कोटी रुपयांचा नसून, 6500 कोटींहून अधिक असल्याचेही समोर आले आहे. PMC बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीला जे चेक मिळाले आहे. ते 10 कोटींहून अधिक रकमेचे आहेत. इतर 50-55 लाख रुपयांच्या रकमेसंदर्भात माहिती नाही. तसेच हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सुरवातीला 4355 रुपयांचा झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता या गैरव्यवहार आकडा वाढला असून, 6500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बँकेच्या रेकॉर्डवरून 10.5 कोटी रुपये गायब झाल्याचे सांगितले जात आहे. 

Webtitle : PMC Account holders agitation against mumbai high court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT