मुंबई

"पीएमसी बॅंकेत गैरव्यवहार नाही' 

सकाळ वृत्तसेवा



मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 27) बडतर्फ व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषदेत केले. खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असे सांगत त्यांनी खातेदारांना दिलासा दिला. 


भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर 23 सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत. बॅंकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आल्यामुळे खातेदार हवालदिल झाले आहेत. पीएमसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना प्रशासकाने बडतर्फ केले आहे. या पार्श्‍वभूमीवर थॉमस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. 


पीएमसी बॅंकेत घोटाळा झालेला नाही. ही परिस्थिती सात वर्षांपूर्वी निर्माण झाली आहे. त्यामुळे या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या कर्जांची माहिती देण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले. मदत मागण्यासाठी व स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बॅंकेकडे गेले होतो; मात्र कारवाई करण्यात आली, असे थॉमस म्हणाले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात अजूनही सगळ्यात मागे

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT