police action accused vandalized church in Mahim Mumbai arrested crime  esakal
मुंबई

Crime news : मुंबईतील माहीम येथील चर्च आवरत असलेल्या कब्रस्तानात तोडफोड करणारा आरोपी अटकेत

मुंबईच्या माहीम येथील सेंट मायकल चर्चमधल्या कब्रस्तानात तोडफोड करणारा आरोपीला पोलिसांनी अटक केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या माहीम येथील सेंट मायकल चर्चमधल्या कब्रस्तानात तोडफोड करणारा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.माहीम पोलिसांनी आरोपीला नवी मुंबई परिसरातून घेतलं आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दाऊद इब्राहिम मोहम्मद अन्सारी असे आरोपीचे नाव असून तो आरोपी मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.शनिवारी 7 जानेवारी रोजी सकाळी माहीम चर्चमधल्या स्मशानभूमीत तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती . माहीम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती..

मुंबईतील माहीम परिसरात शनिवारी सकाळी 6 वाजता एका अज्ञात तरुणाने चर्चमध्ये प्रवेश केला. तो प्रथम चर्चच्या प्रार्थनागृहात गेला, तेथे जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर जवळच असलेल्या स्मशानभूमीत जाऊन तोडफोड केली.

या अनोळखी तरुणाने स्मशानभूमीतील एक-दोन नव्हे तर एकूण 18 क्रॉस तोडले. अवघ्या काही मिनिटांत अज्ञात आरोपीने या क्रॉसना लक्ष्य केले. ही बाब चर्चच्या सुरक्षेला कळताच या तरुणाला अटक करण्याचा प्रयत्न झाला.

मात्र यादरम्यान तो कसातरी सुरक्षारक्षकाला धक्का देऊन तेथून फरार झाला. शनिवारी सकाळी लोक प्रार्थनेसाठी जात असताना हा तरुण चर्चमध्ये घुसला. त्यामुळे त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. माहीम पोलीस तपास करून आरोपीला पकडण्यात यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samudra Manthan: पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील 'समुद्र मंथन' योजना काय आहे? ८४ हजार कोटींच्या खर्चाला सरकारची मंजुरी

Commonwealth Games 2026: दे दणा दण... पोरींनी जिंकली २ सुवर्ण! प्रीती पवार, जैस्मिन यांचा गोल्डन पंच; तिहेरी उडीत रौप्य व कांस्य...

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्स आणि पाकिस्तानच्या कर्णधाराने मैदानावर एकमेकींना मारली मिठी; नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT