मुंबई

तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा


माणगाव : वेगवेगळ्या कारणांनी दररोज घरात होणाऱ्या कौटुंबिक भांडणावरून जन्मदात्या पित्याने आपलीच दोन लहान मुले व पत्नी यांची रशीने गळा आवळून हत्या केली. गुरुवारी (ता. ७) सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची कबुली आरोपी संतोष शिंदे यांनी पोलिसांना दिल्यानंतर त्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (ता. ८) दुपारी आरोपी संतोष शिंदे याला माणगाव न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला  १५ नोव्हेंबरपर्यंत ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला.
या घटनेतील आरोपी संतोष शिंदे (४३, रा. दहिवली) याचे घरात नेहमीच पत्नीशी विविध कारणांनी कौटुंबिक वाद होत असत. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याचे व पत्नीचे घरात जोरदार भांडण झाले. या भांडणाच्या रागातच त्याने आपली पत्नी सुहानी शिंदे (३०), मोठा मुलगा पवन (४), लहान मुलगा संचित (२) या तिघांची गळा आवळून हत्या केली.
या घटनेनंतर आरोपी संतोष शिंदे याने आपल्या हातून घडलेल्या कृत्याची माहिती गावचे पोलिस पाटील चंद्रकांत चेरफळे यांना दिली. पोलिस पाटील चेरफळे यांनी या हत्याकांडाची माहिती ताबडतोब गोरेगाव पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून गोरेगाव पोलिसांनी तातडीने दहिवली गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पंचनामा झाल्यावर तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल टोम्पे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT