मुंबई

अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले; वसई-विरारमध्ये पोलिसांकडून धरपकड सुरू

प्रसाद जोशी

वसई ः वसई-विरार शहरात नागरिकीकरण वाढत आहे. याचाच फायदा घेत दाट वस्ती शोधून अमली पदार्थांची विक्री करणारे काही नायजेरियन वास्तव्य करतात. याची पाळेमुळे वसई-विरार शहरात वाढली आहेत. त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे. आता पोलिसांनी कंबर कसली असून, तस्करांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे तस्करांचे धाबे दाणाणले आहे. 

नालासोपारा प्रगतीनगर येथे नुकतेच दीड कोटीचे अमली पदार्थ पोलिसांनी सापळा रचून जप्त केले व संशयित नायजेरियनांच्या मुसक्‍या आवळल्या. यानिमित्ताने नायजेरियन व अमली पदार्थ हा प्रश्‍न समोर आला आहे. वसईत चाळी, इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गुन्हेगार या ठिकाणी आसरा घेतात. वाढती लोकसंख्या पाहता त्यामानाने पोलिस बळ अपुरे होते म्हणून मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाची स्थापना झाली. नव्याने अधिकारी, कर्मचारी रुजू झाले आहेत. गुन्हेगारीवर अंकुश बसण्यासाठी या पोलिसांचा फायदा होऊ शकतो. 

पश्‍चिम आफ्रिका येथील फेडरल रिपब्लिक ऑफ नाईजीरिया या देशातील नायजेरियन नागरिक वैद्यकीय उपचार, शिक्षण, पर्यटन याकरिता भारतात येतात; मात्र विसाची मुदत संपली तरी अवैध मार्गाने राहतात. मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या उपनगरात संख्या वाढतच आहे. वसई-विरार शहरात काही महिन्यांपूर्वी 42 नायजेरियनची नोंदणी झाली होती; परंतु यांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे. जे चाळीत किंवा इमारतीत भाडेतत्त्वावर घर घेणे यासाठी जास्त भाडेही दिले जाते; परंतु इमारतीत धिंगाणा घालणे यामुळे अनेकदा रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत असते. नालासोपाऱ्यात काही महिन्यांपूर्वी नायजेरियन नागरिकाचा मृत्यू झाला. या वेळी नायजेरियन संतप्त होत रस्त्यावर उतरले व वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली होती. 

वसई-विरार शहरात अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. संबंधित पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेही दाखल करून आरोपींची चौकशी केली जात आहे. अशा लोकांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. 
- संजय पाटील,
उपायुक्त, वसई

--------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT