Candle March sakal media
मुंबई

डॉक्टर मारहाण प्रकरण : डॉक्टरांनी कँडल मार्च काढून पोलिसांचा केला निषेध

भाग्यश्री भुवड

मुंबई : नीट पीजी प्रवेश (NEET post graduation admission) प्रक्रियेला विलंब झाल्याबद्दल दिल्लीत आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांना (Doctors strike) पोलिसांनी मारहाण केल्याने डॉक्टरांमध्ये (police beating doctors) नाराजी पसरली आहे. याबाबत डॉक्टरांच्या विविध संघटनांनी (Doctors union) निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च (Doctors candle march prohibition) काढून आपला निषेध व्यक्त केला आहे. (Police beaten doctors in Delhi strike candle march prohibition in kem hospital Mumbai)

दिल्लीत शांततेत आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांशी पोलिसांनी गैरवर्तन केले. आंदोलनात सहभागी महिला डॉक्टरांशीही पोलिसांनी गैरवर्तन केले. याचा देशभरातील डॉक्टरांनी तीव्र निषेध केला आहे. मुंबईतही डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने मंगळवारी सायंकाळी रुग्णालय परिसरात कँडल मार्च काढून पोलिसांच्या या वागणूकीचा निषेध केला.

केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. सचिन पट्टीवार यांनी सांगितले की, कोविड योद्धांसोबत सरकारचा हा गैरव्यवहार आहे. जे डॉक्टर कधीही सहन करणार नाहीत. नीट -पीजी प्रवेश प्रक्रियेला होणाऱ्या दिरंगाईबाबत येत्या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT