Crime sakal
मुंबई

Virar News : वीस रूपयांसाठी पोलिसाने दुकान दाराचे नाक फोडले

माणिकपुर पोलीस ठाण्यातली घटना.

सकाळ वृत्तसेवा

विरार - मेहनतीच्या वीस रुपयांच्या मजूरीसाठी एका गरीब दुकान दारास पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण करीत नाक फोडल्याची घटना गुरुवारी माणिकपुर पोलीस ठाण्यात घडली. या नंतर जखमी दुकानदाराने पोलीस तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, त्यास अधिकारी वर्गाने पिटाळून लावले. पोलिसांच्या या मग्रुरी विरोधात पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांच्याकडे तक्रार निवेदन सादर करण्यात आले आहे.

अधिक माहिती नुसार, मोहम्मद अली अन्सारी (३३) रा. माणिकपुर यांचा माणिकपूर पोलीस स्टेशनच्या समोर चावी बनवण्याचा व्यवसाय आहे मागील पंधरा वर्षापासून अन्सारी येथे व्यवसाय करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. गुरुवार दिनांक १६ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती दोन चाव्या बनवण्यासाठी या ठिकाणी आली होती. सदर चाव्यांचे ८० रुपये मजुरी होत असल्याचे सांगण्यात आले.

चाव्या बनवून झाल्यानंतर आपण पोलीस असल्याची बतावणी करून केवळ ६० रुपये देऊन सदरच्या व्यक्तीने अन्सारी यांना दमदाटी केली. या बाबतचा वाद समोरच्याच माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गेला असता, सदर ठिकाणी कर्तव्यावर ठाणे अंमलदार असलेले राजशेखर सरगरे यांना अन्सारी यांनी झालेला प्रकार सांगितला.

वास्तविक पाहता उर्वरित वीस रुपये सदर व्यक्तीने देणे आवश्यक असतानाही सरगरे यांनी उलटपक्षी अन्सारी यांना शिवीगाळ दमदाटी करीत पोलीस ठाण्यातच मारहाण सुरू केली. या मारहाणी दरम्यान त्यांच्या नाकावर जोरात प्रहार केल्याने अन्सारी रक्तबंबाळ झाले.

या घटनेनंतर भांबावलेल्या अन्सारी यांनी पोलीस निरीक्षक राजू माने यांना झालेला प्रकार कथन केला 'आपल्याला तक्रार द्यायची असून माझी तक्रार घेतली जात नाही' अशी कैफियत अन्सारी यांनी मांडली परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.

रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे त्यांनी पारनाका येथील सर डी एम पेटीट रुग्णालय गाठले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अन्य उपचारासाठी निदान सिटी स्कॅन येथे जाऊन चाचण्या केल्या. यात नाकाचे हाड तुटून गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले.

चावी बनवण्यासाठी आलेली व्यक्ती ही रेल्वे पोलीस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. संपूर्ण प्रकारात माणिकपुर पोलिसांनी एका गरीब दुकानदारास न्याय मिळवून देण्या ऐवजी नाहक त्रास देऊन थेट पोलीस ठाण्यात मारहाण केल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त वसई यांच्याकडे दाखल केल्या आहेत.

याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांना विचारणा केली असता, आपली रात्रपाळी असल्यामुळे झालेल्या प्रकाराबद्दल आपल्याला माहिती नाही. या घटनेची आपण माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT