मुंबई

ठरलं होतं १६० नागरिकांना UP ला घेऊन जायचं, पण हुशार पोलिसांमुळे असा फिस्कटला प्लान

सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशात कोरोनाच्या संकटाने धुमाकुळ घातला असुन, या संकटाला हरविण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन घोषीत केला आहे. अशातच कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या मुंबईतील नागरीकाना उत्तर प्रदेशला घेऊन निघालेले तीन ट्रक रफी किडवाई मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर याप्रकरणी चालक-वाहकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरबेज सुलेमान (25), मोहमद वसीम मो हुसेन चौधरी (50), धर्मेंद्र कुमार छोटेलाल हरिजन (32), क्लिनर सैफउद्दीन इस्माईल खान (25) यांना अटक केली आहे. आर.ए. के.मार्ग पोलीस ठाणे अंतर्गत ज्ञानेश्वर नगर जंकशन याठिकाणी नाकाबंदी चालू असताना तीन ट्रक एका मागोमाग येत होते. नाकाबंदीवर असलेल्या पोलिस पथकाने  त्यांना पाहिले असता ते ट्रक बंदिस्त असल्याने यावेळी पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून पाहणी केली असता त्या ट्रक्समधून एकूण 160 नागरीकांची मुंबई ते उत्तर प्रदेश अशी बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

यावेळी तात्काळ प्रवाशांना आणि वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आलंय. या सर्वांवर कोरोनामुळे मुंबईमध्ये आणि देशात लॉकडाऊन असताना त्याचा भंग करून विनापरवाना लोकांची वाहतूक केल्याप्रकरणी आर ए के मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व परप्रांतीय नागरीकांच्या खाण्याची व पिण्याची व्यवस्था केली आहे. आरोपींनी त्यांच्याकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही आरएके मार्ग पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला होता. त्यात 40 नागरीक होते. ते सर्वजण उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे जात होते. आरएके मार्ग पोलिसांच्या हद्दीत मुंबई बाहेर जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे त्यांनी या परिसरात नाकाबंदी लावली असून संशयीत गाड्या अडवून त्यांची तपासणी सुरू आहे. 

police caught 3 trucks with 160 people illegally travelling from mumbai to UP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT