Police complaint against contestant of Hindi Bigg Boss program mumbai Esakal
मुंबई

Bigg Boss : हिंदी बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकाविरोधात पोलीस तक्रार

खार पोलीस ठाण्यात मनोज कोळी यांनी लेखी तक्रार दिली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदी बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकावर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी मुंबईतील खरदांडा परिसरातील नागरिक मनोज कोळी यांनी केली आहे. या संदर्भात खार पोलीस ठाण्यात मनोज कोळी यांनी लेखी तक्रार दिली आहे.

हिंदी बिग बॉस सिजन 16 मधील अल्ताफ शेख ऊर्फ एम सी स्टेन नामक स्पर्धकाने मुंबईतील खार दांडा कोळीवाडा गावा बद्दल अभद्र भाषेचा वापर केल्याने आमच्या स्थानिक नागरिकाच्या भावना दुखावल्या गेल्याचा तक्रारीत आरोप आहे. कलाकाराने खार दांडा कोळीवाडा गावा बद्दल फकीर शब्दाचा वापर केल्याने तमाम स्थानिक नागरिकाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

एम सी स्टेन वर योग्य गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा हा कार्यक्रम बंद पाडू असा इशारा तक्रारीत दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी अजून गुन्हा नोंदवला नसून योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT