Congress former mla Sanjay dutt sakal media
मुंबई

डोंबिवली: माजी आमदार संजय दत्त यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

चार महिन्यांत दुसरा गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : गॅस सिलिंडर (Gas cylinder) वितरणाचे काम करणाऱ्या दिपक निकाळजे (वय 27) या तरुणास धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार संजय दत्त (Sanjay dutt) यांच्यासह अन्य तिघांविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात (Manpada police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही गॅस सिलिंडर सप्लायरला मारहाण केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल (Police complaint filed) आहे. चार महिन्यांत हा दुसरा गुन्हा माजी आमदार दत्त यांच्यावर दाखल झाला आहे.

कल्याण पूर्वेत राहणारा दिपक निकाळजे हा गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर वितरणाचे काम करतो. दोन तीन महिन्यांपूर्वीच त्याने दत्त यांच्याकडील काम सोडले आहे. त्यानंतर आमच्या माणसांना धमकावतो असा आरोप करीत दत्त यांनी दिपक याला रविवारी सकाळी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी माणसे पाठवून जबर मारहाण केल्याचा आरोप दिपक यांनी केला आहे. मला घरातून उचलून घेऊन जाईन. तू माझे भीषण रूप पाहिलेले नाहीस. मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दत्त यांनी मोबाइलवरून दिल्याची आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याचे दिपक यांनी दाखल तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वीही गॅस सिलिंडर सप्लायर राज यादव याला केलेल्या कामाचा हिशोब मागितले, तसेच खर्चासाठी पैसे मागितले म्हणून मारहाण केली होती. यावरुन नोव्हेंबर महिन्यात विष्णूनगर पोलिस ठाण्यात दत्त यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामुळे दत्त यांच्याविरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय दत्त यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

माजी आमदार दत्त यांनी आरोप फेटाळले...

दरम्यान, माजी आमदार दत्त यांनी निकाळजे याचे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. निकाळजे गैस सिलिंडरकरिता जादा पैसे उकळत असल्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. यामुळे आमच्या एजन्सीची बदनामी होत होती. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले आहे. परंतु तो आता आमच्या अन्य कामगारांना काम करू नका, अशी दमदाटी करु लागला. त्याबाबत त्याला समजावले असता त्याने खोटी तक्रार दिल्याचे दत्त यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT