मुंबई

बोंबला ! ७ कोटींचे दागिने आणि पोलिस कॉन्स्टेबलच गजाआड... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई: मुंबईत चोरीचे प्रकरणं काही नवीन नाहीत. चोर चोरी करण्यासाठी कोणाची मदत घेतील याचा काहीही नेम नाही. अशाच एका चोरीच्या प्रकरणात एका पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या ७ कोटींचे दागिने चोरीच्या प्रकरणात ओशिवारा पोलिस स्टेशनच्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एका हाऊसिंग सोसायटीत असलेल्या एका दागिन्यांच्या दुकानात तब्बल ७ कोटींची चोरी झाली होती. या प्रकरणात त्या हाऊसिंग सोसायटीचा सफाई कर्मचारी पंकज रमलीवार गौड याला आणि त्याच्याबरोबर ओशिवारा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल संतोष राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

"या प्रकरणात कॉन्स्टेबल संतोष राठोड यांचा हात आहे. तसंच त्यांच्याकडे ८० लाखांचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे संतोष राठोड यांना ६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे," असं MIDC पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  जगदीश शिंदे यांनी म्हंटलंय.

पोलिसांनी या आधी या प्रकरणात एका NGO चे अध्यक्ष असलेल्या ३५ वर्षांच्या विपुल आनंद चाम्ब्रिया यांच्यासोबत एकूण ६ जणांना अटक केली आहे. या सातही जणांकडून पोलिसांनी तब्बल ५.३० कोटींचे दागिने जप्त केले आहेत. या सर्वांनी २२ एप्रिलला एका दागिन्यांच्या दुकानाचं कुलूप गॅस कटरनं तोडून तब्बल ७ कोटींचे दागिने लंपास केले होते. या सर्वांवर आता पुढील कारवाई सुरु आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.

police constable under arrest for stealing jewelry worth seven crore

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT