मुंबई

#VIDEO : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या टीकटॉक्यांना पोलिसांचा इंगा

सकाळ वृत्तसेवा

मानखुर्द : संचारबंदीचे उल्लंघन, सामाजिक अंतर न पाळता, मास्क न वापरता टीकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारीपहाटे अटक केली. सलीम शेख व फहाद शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांना नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले. 

गोवंडीच्या शिवाजीनगर मधील बाजीप्रभू देशपांडे मार्गावर फिरताना सोमवारी सकाळी सलीम व फहाद ने टीकटॉक व्हिडिओ बनवला व समाज माध्यमांवर प्रसारित केला होता. त्यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता तसेच संचारबंदीचे उल्लंघन करत बनवला होता. त्यामध्ये पोलीस सेलेब्रिटींना मारत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले होते. मंगळवारी पहाटे त्यांना शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्हा नोंदवून अटक केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांची माफी मागितली तसेच नागरिकांना मास्क वापरण्याचे व संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले. संचारबंदीचे पालन न केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतात असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी समज देऊन त्यांची जामिनावर मुक्त्तता केली

police custody to Tiktok users in Shivaji Nagar of Govandi mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT