antilia google
मुंबई

अँटिलिया प्रकरण : मुंबई पोलिसांकडून संशयिताची चौकशी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आझाद मैदान पोलिस ठाणे (Azad maidan police station) परिसरात दोन संशयितांकडून अँटिलियाची (Antilia) चौकशी केली जात असल्याची तक्रार टॅक्सी चालकाने केली. त्यानंतर पोलिसांनी आझाद मैदान ते गावदेवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

काही महिन्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर या गाडीचा मालक असलेल्या मनसुख हिरेन याचादेखील संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. याप्रकरणी सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा देखील यामागे हात असल्याचे बोलले जात होते. अद्यापही याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी आझाद मैदान पोलिस ठाणे परिसरात दोन संशयितांनी अँटिलियाची चौकशी केली. याबाबत टॅक्सी चालकाने तक्रार दिली होती. पोलिसांना माहिती मिळताच आझाद मैदान ते गावदेवी मार्गावर नाकाबंदी केली. पोलिसांनी गस्तीदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, या दोघांची नावे अद्याप समजू शकली. या दोघांचीही चौकशी केली जात आहे.

संशयितांपैकी एक गुजरातचा टॅक्सी चालक होता. त्याला चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्याच्याकडून अद्याप काहीही संशयास्पद आढळून आले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT