cyber crime saka Media
मुंबई

नवी मुंबई : महिलेच्या खात्यातील सेवानिवृत्तीची रक्कम लांबविली; अज्ञाताविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बँकेचे टेली व्हेरीफिकेशन (Bank tally verification) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (cyber thief) खारघरमध्ये राहणाऱ्या महिलेला लिंक पाठवून त्याद्वारे सदर महिलेच्या बँक खात्यात जमा असलेली सेवानिवृत्तीची सुमारे ६ लाख २९ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याची (Money Fraud) घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी (Kharghar Police) या प्रकरणातील अज्ञाताविरोधात (Fraud case filed) फसवणुकीसह गुन्हा दाखल केला आहे.

सुरेखा वेधिकार (वय ६०) या खारघर सेक्टर-३५ मध्ये राहण्यास असून त्यांना सेवानिवृत्तीची व ग्रॅच्युईटीची काही लाखांची रक्कम मिळाली होती. सदर रक्कम त्यांनी दोन बँक खात्यात ठेवली होती. ३० मार्च रोजी वेधिकार घरी असताना, सायबर चोरट्यांनी त्यांना एसबीआय बँकेचे टेली व्हेरीफिकेशन बाकी असल्याचा मेसेज पाठवून देत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर दिला.

वेधिकार यांनी सदर नंबरवर संपर्क साधला असता, सायबर चोरट्यांनी एसबीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून दिली. सदर लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून रक्‍कम गायब झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT