Nilesh Rane and sharad Pawar sakal media
मुंबई

शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडणे राणे बंधूच्या आले अंगलट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांचे पुत्र नीलेश राणे (Nilesh rane) आणि आमदार नीतेश राणे (Nitesh rane) यांच्‍याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे गँगस्टर दाऊद इब्राहिमशी (dawood ibrahim) संबंध असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माजी खासदार नीलेश राणे यांनी पवार यांचे दाऊद यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राजीनामा देण्यास नकार देत असल्याने पवार आणि दाऊद यांच्यात संबंध आहे का, असा प्रश्न भाजप आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला होता. शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी राणे बंधूंविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुन्हा हा गुन्हा आझाद मैदान पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेण्यात येत नाही, असा सवाल नीतेश राणे यांनी विचारला होता. मूळात राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचा आहे. अनिल देशमुख मराठा असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आला, पण नवाब मलिक मुस्लिम असल्याने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असे नीतेश राणे म्हणाले होते.

नीतेश राणे हे हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चव्हाण यांच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच पवार हे दाऊदचा माणूस असल्याचे ट्विट नीलेश राणे यांनी केले होते. ज्याने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बस्फोटांचा आरोप असलेल्या व्यक्तींशी व्यवहार केला, तरीही त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा आरोप नीलेश यांनी केला होता.

तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

राणे बंधू जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी शरद पवारांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडत आहेत. हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न राणे बंधू करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT