kidnapping 
मुंबई

50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी 'असा' उधळला कट

दिनेश गोगी

उल्हासनगर : हिल लाईन पोलिसांना व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. अपहरणकर्त्यांनी 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले. 50 लाखांवरून 10 लाख रुपयांपर्यंत मागणी करण्यात आली. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच अपहरण करणाऱ्यांनी व्यापाऱ्याला सोडून पळ काढला; परंतु हिल लाईन पोलिसांनी त्यांचा छडा लावून चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

कॅम्प नंबर 5 मध्ये राहणारे जीन्स व्यापारी 21 ऑगस्टला भाटिया चौकातून रिक्षाने दुकानात जाण्यास निघाले होते. मात्र रिक्षा ही दुकानाच्या दिशेऐवजी वेगळ्याच दिशेने जात असल्याचे बघून सनी यांनी आरडाओरडा केला. अपहरणकर्त्यांनी सनीला नकली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बेदम मारहाण करत रायता नदीच्या दिशेने नेले. अपहरणकर्त्यांनी 50 लाखांच्या खंडणीसाठी सनीच्या मोबाईलवरून घरच्यांना फोन लावून सनीच्या घरच्यांना खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मुलाचा खून करू, अशी धमकी घरच्यांना देण्यात आली. सनीच्या वडिलांनी हिल लाईन पोलिस ठाणे गाठून संबंधित प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी तात्काळ सायबर सेलच्या मदतीने लोकेशन शोधन दोन गट रवाना केल्या. काही तास आरोपींनी सनीचा मोबाईल बंद केला. शेवटी आरोपींचे लोकेशन प्राप्त झाल्यावर पोलिस आणि आरोपी असा पाठलाग सुरू झाला. आरोपींना पोलिस पाठलाग करत असल्याचे समजताच आरोपींनी सनीची सुटका केली. यातील एका आरोपीचे सनी सोबत व्यापार संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बदलापुरातील चौघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी सनीचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत, पोलिस निरीक्षक मोहन खंदारे, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक विनोद कदम, बाबा जाधव, पोलिस नाईक पंढरीनाथ झोडगे, अमित चौपडे, पोलिस शिपाई शैलेश गायकवाड, विजय खरटमल, सुजित तायडे यांनी कामगिरी बजावली आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Police foil kidnapping of kidnappers demanding Rs 50 lakh ransom

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT