Ganesh Chaturthi 2023 Esakal
मुंबई

Ganesh Chaturthi 2023: आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावाला जाणं पोलीस निरीक्षकास पडलं महागात; आयुक्तांनी केलं निलंबित

आजकाल सुट्टी मिळत नसेल तर दुसरा उपाय म्हणून अनेक जण आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेतात

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजकाल सुट्टी मिळत नसेल तर दुसरा उपाय म्हणून अनेक जण आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेणाऱ्या पोलीस निरीक्षकास, हे खोटं बोलणं फार महागात पडलं आहे. यामुळे पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आलं आहे. (Latest Maharashtra News)

आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावाला जाणं पोलीस निरीक्षकास चांगलंच महागात पडलं आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पोलीस निरीक्षकास निलंबित केले आहे. घाटकोपर मुख्यालयात असलेल्या राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी गणपतीला गावी कणकवलीला जाण्यासाठी रजा मागितली होती.(Latest Marathi News)

मात्र, संवेदनशील बंदोबस्त असल्याने साप्ताहिक सूट्टी वगळता सगळ्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. १४ तारखेला राखीव पोलीस संजय सावंत यांनी आजारी असल्याचं कारण देत सुट्टी घेतली. पण, ते आजारी आहेत का? याची खात्री करण्यासाठी त्याच्या ठाकुर्ली येथील घरी पोलीस कर्मचारी पाठवला असता संजय सावंत गावी गेल्याचे समजताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आली.(Latest Maharashtra News)

गणेशोत्सव सुरू असल्याने राज्यभरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्यभरातून भाविक येत असतात. अशातच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT