Rizwan Kaskar 
मुंबई

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्यावर मोक्का

अनिश पाटील

मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिम प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या होत्या.

बांधकाम आणि चीन व दुबईहून इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात करणाऱ्या व्यावसायिकाने ही तक्रार केली होती. त्याने तीन वर्षांपूर्वी अश्‍फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. त्याला अश्‍फाककडून 15 लाख 50 हजार रुपये येणे होते. त्यासाठी त्याने अनेकदा मागणी केली होती. त्यावेळी अहमद राजा अफ्रोज वधारिया ने 12 जूनला धमकीचा दूरध्वनी केला होता. त्यावेळी त्याने आपण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक फहिम मचमच याचा हस्तक असल्याचे सांगून धमकावले आहे. त्यावेळी इक्बाल कासकरचा मुलगा  रिजवान याने ही त्या व्यावसायिकाला धमकावले होते. त्याने निकटवर्तीय असलेल्या टॉवलवालाकडून पैशाची मागणी करू नकोस, अशी धमकी त्याने तक्रारदाराला दिली. 13 आणि 16 जूनला वधरियला आलेले हे धमकीचे दूरध्वनी त्याने दूरध्वनी रेकॉर्ड करून या तिघांविरोधात मुंबईपोलिसांना तक्रार दिली. त्यावेळी गुन्हा दाखल करून दुबईवरून परतल्यानंतर अहमदला अटक करण्यात होती.

अहमदला मुंबई विमानतळावर अटक झाल्याची बातमी डि कंपनीत पसरल्यानंतर रिजवानच्या मनात धडकी भरली. पोलिस कोणत्या ही क्षणी दरवाजावर येऊन पोहचतील त्यामुळेच 18 जुलैला राञी तो मिळेल त्या विमानाने दुबईला पळण्याच्या प्रयत्नात होता. माञ पोलिसांनी वेळीच रिजवानच्या मुस्क्या आवळत त्याला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

Kamshet double murder case solved: कामशेतमधील दुहेरी खुनाचा उलगडा; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना अटक

SCROLL FOR NEXT