मुंबई

मुंबईत बड्या सेलिब्रेटींच्या पार्टीवर पोलिसांची धाड; सुरेश रैना, गुरू रंधावा आदींवर कारवाई

तुषार सोनवणे

मुंबई पोलिसांची जेडब्लु मॅरियेट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय पबवर मोठी कारवाई केली आहे. कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मधील स्टाफ आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या पार्टीसाठी काही लोक कालच दिल्ली आणि दुबईवरून आले होते. जेडब्लू या हॉटेलमधील पार्टीमध्ये सहभागी झाले होते अशी माहिती मिळत आहे. या पार्टीमध्ये क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरू रंधावा, सुसेन रोशन खान हेसुद्धा या पार्टीत सहभागी होते अशी  माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरोधात 41A अंतर्गत नोटिस बजावून सगळ्यांना सोडण्यात आले आहे. सर्वांवर आपत्ती व्यवस्थान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपर बादशाह या पार्टीतून फरार झाल्याचीही माहिती मिळत आहे. एकून 34 लोक या पार्टीत सहभागी होते.

कोव्हिड काळात सरकारने नियम शिथिल केले आहेत. या नियमांना बाधील राहुनच पार्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. तरीसुद्धा अशाप्रकारच्या पार्ट्या नियमांना धाब्यावर बसवून कशा पद्धतीने सुरू आहेत याचे हे उदाहरण आहे. मुंबईत रात्रीचा कर्फू लागू करण्यात आला असताना अशा प्रकारच्या पार्टी आयोजित करणाऱ्यांवर पोलिसप्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

'ब्रिटनमध्ये धोकादायक ठरत असलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाईट कर्फू जाहीर करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना पार्टीविषयी माहिती मिळाली. या पार्टीत सहभागी असलेल्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे'

विश्वास नांगरे पाटील,

पोलिस उपायुक्त, कायदा सुव्यवस्था, मुंबई

--------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT