Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime : "मी लवकरच मुंबईला बॉम्बने उडवणार" मुंबई पोलिसांना धमकी, यंत्रणा सतर्क

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची किंवा गोळीबार करण्याची धकमी अनेकदा मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये आता परत एका धमकीची भर पडली असून ही धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. आरोपीने ट्वीटरवर पोस्ट करत ही धमकी दिली असून पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे.

काल सोमवारी साधारण सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही पोस्ट पडली असून "मी मुंबईला लवकरच बॉम्बने उडवणार आहे." असा मेसेज या व्यक्तीने ट्वीटरवर केला आहे. त्यामुळो पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

धमकी मिळाल्यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली असून त्याला अटक केली आहे. त्याचबरोबर या आरोपीची चौकशी करण्यात येत असून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यासंदर्भातही मुंबई पोलिसांनी फोन आला होता.

दरम्यान, काल (सोमवारी) मुंबई पोलीस कंट्रोल रूमला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्यामध्ये त्याच्याकडून "मला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात माहिती देणारे फोन येत आहेत" अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्याने फोन लगेच कट केला होता. त्यामुळे मुंबई पोलीस अलर्टवर आले असून या फोनसंदर्भात माहिती घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT