t raja singh lodh  sakal
मुंबई

Mumbai News : भाजप नेते टी राजांवर वादग्रस्त विधाना प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

टी राजा सिंह यांच्यावर जानेवारी महिन्यात मुंबईत सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या सभेत भडकाऊ भाषण केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांनी भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टी राजा सिंह यांच्यावर जानेवारी महिन्यात मुंबईत सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या सभेत भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे.

प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला दादरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला होता. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. लव्ह जिहाद आणि लँड जिहादला मुद्दा बनवत मोर्चात घोषणा देण्यात आल्या. या बैठकीत टी राजा सिंह यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी प्रक्षोभक भाषण देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

अलीकडेच, त्याच्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला. ज्यामध्ये ते मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एका जाहीर सभेत सिंह यांच्या भाषणाचा होता.

प्रक्षोभक भाषणे

यावेळी सभेत टी राजा सिंह म्हणाले होते की, जो कोणी हिंदूंच्या विरोधात बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. मुस्लिम नमाज अदा करत असल्याच्या संदर्भात ते म्हणाले, "हिंदू राष्ट्रात तुम्हाला नमाज अदा करण्यासाठी लाऊडस्पीकर देखील मिळणार नाहीत. सिंह म्हणाले होते की 2026 पर्यंत भारत "संयुक्त हिंदू राष्ट्र" घोषित होईल .

पुढे टी राजा सिंह यांनी त्यांच्या भाषणात म्हटलेलं होतं की, ‘हिंदू समुदाय एकजूट होण्याची हीच योग्य वेळ आहे. एका समाजाच्या वर्चस्वाविरुद्ध उभं राहायला हवं. आपल्या बहिणी, मुली एका समुदायाने ठरवून बनवलेल्या योजनांच्या शिकार बनत आहेत.

मी प्रत्येक हिंदूला आवाहन करतो की, अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांच्या दुकानातून कोणतेही सामान खरेदी करू नये, त्यांच्यावर बहिष्कार टाकावा,’ असं ते म्हणाले होते.

वादग्रस्त पार्श्वभूमी

तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये टी. राजा सिंह विरुद्ध द्वेष पसरवणारी भाषणे केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. राजा सिंह यांना ऑगस्ट 2022 मध्ये इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT