Police sakal
मुंबई

पोलिसांनी चोरीला गेलेला दिड कोटींचा मुद्देमाल नागरिकांना केला परत

चोरी, दरोडा, घरफोडी, फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची उकल कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी केली आहे.

शर्मिला वाळुंज

चोरी, दरोडा, घरफोडी, फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची उकल कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी केली आहे.

डोंबिवली - चोरी, दरोडा, घरफोडी, फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची उकल कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी केली आहे. 80 गुन्ह्यांमधील सुमारे 1 कोटी 50 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून मिळविला असून या मुद्देमालाची त्या त्या ग्राहकांना बुधवारी हस्तांतरण करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत एकूण 8 पोलिस ठाणे येतात. कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडा, फसवणूक, घरफोड्या यांसारख्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस पथकांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी उत्तम कामगिरी करत अनेक गुन्ह्यांची उकल आत्तापर्यंत केली आहे. यातील 80 गुन्ह्यात सुमारे 1 कोटी 50 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात कल्याण विभागातून 47 गुन्ह्यांची उकल करत 41 लाख 56 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर डोंबिवली विभागातून 33 गुन्ह्यांची उकल करत 1 कोटी 9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीच्या गुन्ह्यांची संख्या ही सर्वाधिक म्हणजेच 38 असून 53 लाख 11 हजाराचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला आहे. त्याखालोखाल मिसिंगचे 13 व घरफोडीचे 12 गुन्हे उकल करण्यात आली आहे. तर फसवणूकीचे 5 गुन्हे त्यातून 48 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधत बुधवारी कल्याण परिमंडळ 3 परिसरातील वेगवेगळ्या गुन्ह्यातील हस्तगत केलेला मुद्देमाल अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या उपस्थितीत फिर्यादी आणि मुळ मालकांना हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी कल्याण सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटिल, डोंबिवलीचे सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक उशोक होनमाणे, नरेंद्र पवार, सर्जेराव पाटील, बशीर शेख, सचिन सांडभोर, शेखर बागडे, पंढरीनाथ भालेराव, अजय आफळे यांसह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT