Crime sakal
मुंबई

Mumbai News : सीआयएसएफ जवानाची चोरी झालेली बंदुकीची मॅगझीन शोधण्यात पोलिसांना यश; तीन संशयीत ताब्यात

मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या ऑरेंज प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या रायफलचे मॅगझीन शनिवारी हरवली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या ऑरेंज प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या रायफलचे मॅगझीन शनिवारी हरवली होती. त्याप्रकरणी 24 तासांत मॅगझीन हस्तगत करत 3 संशयीत आरोपीना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

गौरेश वगळ , श्रेयस चुरीया, अभिषेक माणगावकर अशी अटक आरोपीची नाव आहे.प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेहमीप्रमाणे शनिवारी यलोगेट येथे सीआयएसएफ जवान कर्तव्यावर होता. त्यावेळी अचानक एक चारचाकी प्रवेशद्वारातून आत आली. कर्तव्यावरील सीआयएसएफ जवानाने गाडी थांबवत चालकाकडे चौकशी करू लागला.

मात्र त्याचवेळी जवानाला धक्का देत अचानक वाहन वेगाने सीएसएमटीच्या दिशेने निघून गेले. त्यावेळी जवानाची रायफल गाडीच्या दरवाजावर आपटल्यामुळे रायफलची आतील मॅगजिन गाडीत पडली. गाडी निघून गेल्यानंतर गोळ्यांनी भरलेली मॅगझीन रायफलमध्ये नसल्याचे जवानाच्या लक्षात आले.

गाडीत मॅगझीन पडल्याचा संशय आल्यानंतर वाहनाचा क्रमांक मिळवून सर्व प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात आले. पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्ष व इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित गाडीचा शोध घेतला असता, तीन संशयीत गौरव वगळ, श्रेयस चुरी व अजित माणगावकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता 30 जिवंत काडतुसे असलेली मॅगझीन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli politics news : 'जयंतराव, विश्वजित कदमांनी विशाल पाटलांचे काँग्रेसचे ‘तिकीट’ कापले', पडळकरांच्या गौप्यस्फोटाने सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

IPL 2026: दिल्लीसमोर पंजाबला रोखण्याचे आव्हान; श्रेयस अय्यरची अपराजित सेना सहाव्या विजयाच्या मार्गावर,पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

ACB Trap Nagpur Corruption Case : नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयातला मोठा मासा जाळ्यात! 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडलं

अटकेच्या दिवशीच खरातची जमीन खरेदी, पत्नी फरार असताना तिच्या नावे व्यवहार पूर्ण; महसूल विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT